UPSC निकाल जाहीर! – UPSC Result Out!

UPSC Result Out!

UPSCनं NDA आणि NA 2 परीक्षा 2025 चा निकाल अखेर जाहीर केलाय! १४ सप्टेंबरला झालेल्या या परीक्षेचा निकाल पाहायला सगळ्यांनाच उत्सुकता होती. आता तो UPSCच्या अधिकृत वेबसाइटवर (upsc.gov.in) पीडीएफ स्वरूपात उपलब्ध झालाय.

UPSC Result Out!त्या पीडीएफमध्ये लिखित परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांचे रोल नंबर आणि नाव दिलेली आहेत. ज्या उमेदवारांचा नंबर यात असेल, त्यांना पुढचा टप्पा – म्हणजेच SSB इंटरव्ह्यू – द्यावा लागणार आहे. त्यासाठी भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून इंटरव्ह्यूची तारीख, ठिकाण आणि कॉल-अप लेटर डाउनलोड करता येईल.

NDA ची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होते:

  1. लिखित परीक्षा (९०० गुणांची)

  2. SSB इंटरव्ह्यू

दोन्ही टप्प्यातील कामगिरीनुसार अंतिम निवड ठरते. या वेळेस NDA 2 2025 साठी UPSCनं तब्बल ४०६ रिक्त पदं जाहीर केली आहेत.

निकाल पाहण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे –

  • UPSC ची अधिकृत वेबसाइट उघडा

  • NDA 2 Result 2025 PDF लिंकवर क्लिक करा

  • PDF मध्ये आपला रोल नंबर शोधा

  • भविष्यासाठी डाउनलोड करून सेव्ह करा

त्यामुळे ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनी निकाल लवकरात लवकर तपासावा आणि SSB मुलाखतीसाठी तयारी सुरू करावी.

Comments are closed.