लवकरच ;ससून रुग्णालय एकूण २३५० पदांची भरती ! – Sassoon Hospital Recruitment Soon !

Sassoon Hospital Recruitment Soon !

0

ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात एकूण २३५० पदे मंजूर असून, त्यापैकी ७६९ पदे रिक्त आहेत. त्यात १५६ नर्सिंग पदांचाही समावेश आहे, म्हणजेच वर्ग चारच्या ५०% पदे रिक्त आहेत. ही भरती टीसीएसमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतरही रिक्त पदे भरली गेली नाहीत, मात्र आता येत्या आठ दिवसांत भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

Sassoon Hospital Recruitment Soon !

वर्ग १ ची ४४ आणि वर्ग २ ची ११० पदे तातडीने भरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शरद सोनवणे, भीमराव तापकीर आणि विक्रम पाचपुते यांनी ससून रुग्णालयातील रिक्त पदांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल येणार
राज्यात कॅन्सर रुग्णसंख्या वाढत असल्याने पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार शासन करत आहे. एमएसआरडीसी कडे जागेची मागणी करण्यात आली असून, ससून रुग्णालय परिसर हा त्यासाठी योग्य पर्याय असल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

१२ कोटी ९४ लाख रुपयांची औषध खरेदी
ससून रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने, १२ कोटी ९४ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय, नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली असून, जिल्हा नियोजन समितीकडे अधिक औषध खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.