नागपूरपासून राज्यभर थैमान घातलेल्या शालार्थ घोटाळ्यानंतर शिक्षण विभाग अखेर जागा झालाय! आता शिक्षक-शिक्षकेतर भरती व वेतनासाठी नवा नियम लागू केलाय.
शेकडो बोगस शिक्षक भरती करून कोट्यवधींचा अपहार झाल्यामुळे शिक्षण खात्याची नाचक्की झाली. आता विभागाने शालार्थ प्रणालीत बदल करत नवा आदेश दिलाय. त्यानुसार:
काय नवे नियम लागू झालेत?
शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल, नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, शालार्थ ID आदेश आता शालार्थ पोर्टलवर अपलोड करणं अनिवार्य
हे काम उपसंचालक / मंडळाचे विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरूनच होणार
7 जुलै 2025 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची सर्व कागदपत्रे वरच्या स्तरावरून अपलोड करावी लागणार
2012 ते 2025 दरम्यान नियुक्त कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज 30 ऑगस्ट 2025 पर्यंत शाळा स्तरावरून अपलोड करणं बंधनकारक
नियम न पाळल्यास फौजदारी कारवाई होणार
शालार्थ म्हणजे काय?
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा तपशील यासाठी शासनाची केंद्रीकृत प्रणाली. कोषागार, लेखा इत्यादी विभागांशी जोडलेली आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी आदेश दिल्यानं, आता तरी भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
