महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेसाठी ‘KYC’ म्हणजेच ओळख पडताळणी अनिवार्य केलीये. आधी १५ जुलैपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. पण आता आयोगानं सांगितलंय की २५ जुलै २०२५ पासूनच KYC प्रक्रिया सुरू होईल.
महत्त्वाचं काय?
केवायसी केल्याशिवाय आता अर्ज करता येणार नाही
आधार लिंक असलेला मोबाईल नंबर अनिवार्य
नोंदणी करताना ईमेल व फोन नंबर द्यावा लागणार
4 प्रकारांनी KYC करता येईल:
Aadhaar e-KYC (online)
Aadhaar paperless offline
Aadhaar paper KYC
Non-Aadhaar based offline KYC
उमेदवारांनी आयोगाच्या पोर्टलवर आधी नोंदणी करून, प्रोफाईलमध्ये सगळी माहिती भरून ठेवावी.
UIDAI (आधार प्राधिकरण) आणि राज्य शासनाची मान्यता मिळालेली असल्यामुळे, आता MPSC च्या सर्व टप्प्यांवर उमेदवारांचं प्रमाणीकरण e-KYC द्वारेच होणार.
