आधार अपडेट नाही केलं, तर शिष्यवृत्ती, सरकारी योजना, प्रवेश प्रक्रिया मग बंद !-No Aadhaar, No Entry!

No Aadhaar, No Entry!

0

UIDAI म्हणजेच आधार प्राधिकरणानं आता विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी एकदा आधार घेतल्यानंतर बायोमेट्रिक अपडेट केलंच नाही, त्यामुळे आता UIDAI शाळांमधूनच हे अपडेट करणार हाय.

No Aadhaar, No Entry!काय होतंय नेमकं?

  • वयाच्या ५व्या वर्षानंतर बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य

  • पण ७ कोटींहून अधिक मुलांनी हे केलं नाही

  • त्यामुळे आता शाळांमध्येच मोहीम सुरू होणार

  • ही प्रक्रिया पुढील ४५-६० दिवसांत सुरू होईल

  • शिष्यवृत्ती, शाळा प्रवेश, इतर सुविधा मिळण्यासाठी आधार अपडेट गरजेचं

UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितलं की, पालकांच्या संमतीने शाळांमधूनच बायोमेट्रिक अपडेट केला जाणार. सध्या तंत्रज्ञान चाचणीवर आहे आणि लवकरच कार्यान्वित होईल.

लक्षात ठेवा: आधार अपडेट नाही केलं, तर शिष्यवृत्ती, सरकारी योजना, प्रवेश प्रक्रिया — सगळं अडणार!

Leave A Reply