न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीत मेगा भरती; सहायकपदाच्या 300 जागांची भरती सुरु! – new india assurance recruitment

0

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील नावाजलेल्या विमा कंपनीत नोकरी करण्याची संधी आहे. द न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स या कंपनीने सहायकपदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. जाणून घ्या विमा कंपनीतील नोकरभरतीबाबतची सविस्तर माहिती. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्यामार्फत सहायकपदांच्या तब्बल 300 रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून 1 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना हे अर्ज विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2024 आहे.

 

या भरती अंतर्गत सहायकपदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 37000 इतके वेतन दिले जाणार आहे. विमा कंपनीच्या सहायकपदाच्या भरतीसाठी देशभरातून अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे उमेदवार ज्या राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज सादर करणार आहे. त्याला त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर अथवा समकक्ष असावा. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान 21 वर्षे आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सहायकपदासाठी अर्ज सादर करीत असताना पात्र उमेदवाराने आपली शैक्षणिक माहिती सविस्तर भरणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने आपला अर्ज अंतिम मुदतीच्या आधी सबमिट करावा.

 

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/dtAJQ
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/syQW1
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.newindia.co.in/

Leave A Reply

Your email address will not be published.