मुंबई पोलिसांची 12899 पदे रिक्त, कोणत्या पदासाठी किती जागा मंजूर? – Mumbai Police Recruitment 2024

1

आताच प्राप्त RTI अंतर्गत माहिती नुसार, मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार मुबईत अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे ​रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. RTI  कार्यकर्ते श्री. अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. त्यावर मुंबई पोलीस आयुक्तलयांचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची माहिती दिली. यात एकूण मंजूर पदांची संख्या ५१३०८ आहेत. यात ३८४०९ कार्यरत पदे असून १२८९९ पदे रिक्त आहेत. 

पोलीस शिपाई पदासाठी २८९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७८२३ कार्यरत पदे असून ११११५ पदे रिक्त आहेत. यानंतर पोलीस उप निरीक्षकांची ३५४३ पदे मंजूर असताना फक्त २३१८ कार्यरत पदे असून १२२५ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक १०९० मंजूर पदे असून यापैकी ३१३ पदे रिक्त असून सद्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत. तर अप्पर पोलीस आयुक्त १२ जागांपैकी फक्त १ पद रिक्त आहे.

अनिल गलगली यांच्या मते मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झालेला नाही पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्ती मुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजूर पदांची संख्या वाढविली तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केलं आहे.

1 Comment
  1. tiwari ajay says

    Khupach transparent hwayala Hava
    Berojgarakarita uttam upay ani vyavastha manaje mahiticha adhikar

Leave A Reply

Your email address will not be published.