Aadhaar कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचं ओळखपत्र आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य आहे. हे कार्ड UIDAI द्वारे जारी केलं जातं. आधाराशी संबंधित कोणतेही अपडेट आता UIDAIच्या माध्यमातूनच करता येतात.
१ ऑक्टोबरपासून आधार अपडेटसाठी नवीन शुल्क लागू झाले आहे.
मुख्य बदल:
नवीन आधार कार्ड: मोफत आहे, नागरिक जवळच्या आधार केंद्रात जाऊन बनवू शकतात.
बायोमेट्रिक अपडेट (फिंगरप्रिंट, आयरिस, फोटो): १२५ रुपये (७–१७ वर्षांतील मुलांसाठीही तेच शुल्क). ३० सप्टेंबरपर्यंत हे अपडेट मोफत होतं.
डेमोग्राफिक अपडेट (नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाइल, ईमेल): ७५ रुपये; बायोमेट्रिक अपडेटसोबत मोफत. ऑनलाइन अपडेट केल्यास पूर्णपणे विनामूल्य.
लहान मुलांचे प्रथम बायोमेट्रिक अपडेट (५–७ व १५–१७ वर्षे): मोफत, दुसऱ्या वेळेस १२५ रुपये.
१० वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड: त्वरित अपडेट करणे अनिवार्य.
या बदलांमुळे नागरिकांनी वेळेत आपले आधार कार्ड अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

Comments are closed.