मराठवाड्यात समन्वयक परीक्षा!-Coordinator Exam in Marathwada!

Coordinator Exam in Marathwada!

मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्राप्रमुख) पदावर भरती परीक्षा जाहीर झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान घेतली जाणार आहे.

Coordinator Exam in Marathwada!या प्रक्रियेत २,४१० पदांची भरती होणार आहे, ज्यापैकी मराठवाडा विभागासाठी ४५७ जागा राखीव आहेत. दोन वर्षांच्या थांबीनंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात येत आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

अर्ज प्रक्रियाः

  • २०२३ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी: ८–१८ ऑगस्ट

  • नवीन उमेदवारांसाठी: २५ ऑक्टोबर – १० नोव्हेंबर

  • अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख: १० नोव्हेंबर

  • अधिक माहिती: www.mscepune.in

पात्रता व अटी:

  • टीईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य

  • जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत प्रशिक्षक पदवीधर किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक)

  • किमान ६ वर्षांची अखंडित सेवा आवश्यक

  • उमेदवार ज्या जिल्ह्यात कार्यरत आहेत, त्याच जिल्ह्यातील पदांसाठी निवड पात्र

परीक्षेचे स्वरूप:

  • एकूण २०० गुणांची परीक्षा

    • १०० गुण: बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी

    • १०० गुण: शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम आणि शैक्षणिक नवविचार

मराठवाड्यातील जागा:

  • संभाजीनगर: ६८

  • परभणी: ४३

  • बीड: ७८

  • जालना: –

  • लातूर: ५२

  • धाराशिव: ४०

  • नांदेड: ८०

  • एकूण: ४५७

टीप: परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन होईल.

Comments are closed.