NCC विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज कसा कराल, पूर्ण माहिती बघा!

0

भारतीय सैन्याने एनसीसी या विशेष प्रवेश योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे. यासाठी एकूण ५६ कोर्सेसची जागा उपलब्ध आहे. या कोर्ससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ६ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार भारतीय सैन्याच्या joinindianarmy.nic.in. या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 

  • NCC महिला उमेदवार – ५ जागा
    NCC पुरुष उमेदवार – ५० जागा

NCC Special Admission 2024

नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये [NCC] सामील होऊ इच्छिणारे उमेदवार १ जुलै २०२४ रोजी किमान १९ ते २५ या वयोगटातील असावे ( 2 जुलै 1999 आणि 1 जुलै 2005 दरम्यान जन्मलेले असावे). इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी किंवा सर्व वर्षांचे मिळून किमान ५० टक्के असणारे पदवी प्रमाणपत्र असावे.

जे त्यांच्या अंतिम वर्षांमध्ये शिकत आहेत, तेदेखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांच्याकडे सुरुवातीचे दोन वर्ष मिळून ५० टक्के इतके गुण असणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.