छत्रपती शिवाजी महाराजांचे दैनंदिन शिवविचार जाणून घेण्यासाठी हिंदवी स्वराज्य अँपची निर्मिती । Download Hindvi Swarajya App

Hindvi Swarajya App Download Link

0

Download Hindvi Swarajya App: छत्रपती शिवाजी महाराजांचे दैनंदिन शिवविचार जाणून घेण्यासाठी हिंदवी स्वराज्य अँपची निर्मिती करण्यात आली असून, गुरुवारी (ता. २७) अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन होताच उपस्थित सर्वांनी आणि विशेष उपस्थित असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशजांनीही लगेचच क्यूआर कोड स्कॅन करून अँप डाउनलोड केले. हा उपक्रम खूपच स्तुत्य असल्याचे चर्चा परिसरात होती.

Download Hindvi Swarajya App
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन सुरू झाले असून, मंचावर स्वागताध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे अशोक जैन, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कार्याध्यक्ष डॉ. केतकी पाटील, स्वागत सचिव किरण बच्छाव, योगेश भोईटे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, इतिहास प्रबोधन महाराष्ट्रचे विश्वस्त रवींद्र पाटील, भारती साठे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्याचे हंबीरराव मोहिते यांचे १४ वे वंशज विशाल मोहिते, सुभेदार तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज कुणालजी मालुसरे, धनाजी राजे शिर्के, रवीजी जगदाळे, बावणे सरदार, नेताजी पालकर यांचे वंशज, जद्‌गुरू तुकाराम महाराजांचे वंशज अनिकेत महाराज मोरे उपस्थित होते.
श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि विजयराव देशमुख यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य अँपचे उद्घाटन झाले. महाराजांच्या सरदारांच्या घराण्याचे वंशजांनी त्वरित हिंदवी स्वराज्य अँप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. कार्यक्रमास उपस्थित श्रोत्यांनीही आपापल्या मोबाईलमध्ये हे अॅप डाउनलोड केले. संमेलनस्थळी असलेल्या स्टडीवरून युवक मोठ्या प्रमाणात हिंदवी स्वराज्य अॅप डाऊनलोड करीत आहेत. हे अँप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.