फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स! – Jobs For Freshers Tips 2024
Jobs For Freshers Tips 2024 – सध्याच्या स्पर्धात्मत जगात नोकरी शोधणे हे खूप मोठे आव्हान आहे. अशात फ्रेशर म्हणून नोकरी शोधणे आणखी कठीण वाटू शकते. कोणताही अनुभव नसताना फक्त शिकण्याच्या जिद्दीवर नोकरी मिळणे अनेकदा अशक्य वाटू शकते. अशावेळी स्पर्धेच्या या जगात स्वत:चे कौशल्य ओळखून त्यानुसार आपली प्रोफाइल तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही आत्मविश्वासाने फ्रेशर म्हणून नोकरीच्या जगात प्रवेश मिळवू शकता.
आकर्षक रेझ्युम तयार करा
आपल्या देशात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अनेकदा एकाच नोकरीच्या पदासाठी हजारो लोक अर्ज करतात. अशावेळी आपला रेझ्युम पाहून आपल्याला त्या पदासाठी पात्र ठरवले जाते. नियुक्ती करणारी व्यक्ती ३० सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये रेझ्युम बघतात. त्यामुळे आपला रेझ्युम आकर्षक असणे खूप गरजेचे आहे. रेझ्युम हा आपल्या शिक्षण आणि कौशल्यांचाहा एक स्नॅपशॉट आहे.
इंटर्नशिप करा
फ्रेशरला अनुभव नसतो त्यामुळे त्यांना नोकरी मिळणे अनेकदा कठीण जाते. पण अशावेळी फ्रेशर लोकांसाठी इंटर्नशिप फायद्याची ठरू शकते. इंटर्नशिपमध्ये तुम्ही चांगले ज्ञान मिळवू शकता त्यामुळे जास्तीत जास्त इंटर्नशिप करणे गरजेचे आहे. इंटर्नशिपच्या जोरावर तुम्ही चांगला जॉब मिळवू शकता.
नोकरी शोधण्यासाठी जॉब पोर्टलचा वापर करा
आज जॉब पोर्टलद्वारे नोकरी शोधणे, खूप सोपी झाले आहेत. ऑनलाईन सर्च केल्यावर कित्येक जॉब पोर्टल तुमच्या समोर येतील. या पोर्टलवर तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते. जॉब पोर्टलवर तुम्हाला मनाप्रमाणे चांगली नोकरी, चांगली कंपनी आणि चांगला पगार मिळू शकतो.
कौशल्यांवर भर द्या
अनेकदा नोकरी मिळवताना शिक्षणाशिवाय तुमची कौशल्ये कामी पडू शकतात. तुमची क्षमता, संवाद कौशल्य, समस्या हाताळण्याची तुमची पद्धत इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. याशिवाय नोकरी शोधताना सॉफ्ट स्किल सुद्धा महत्त्वाच्या आहेत.
प्रत्येक क्षेत्रात सॉफ्ट स्किल्सला खूप मागणी आहे. यासाठी फ्रेशर्सनी इंटर्नशिप, ऑनलाईन कोर्सेस द्वारे सॉफ्ट स्किल आत्मसात कराव्यात.