लाडकी बहिणींचा स्वावलंबन प्रवास!-Empowering Sisters with Loans!

Empowering Sisters with Loans!

राज्यातल्या लाडक्या बहिणींना आता मोठा आनंद मिळणार आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेत पात्र असलेल्या महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहेत.

Empowering Sisters with Loans!जरी त्यांना निकष आणि ई-केवायसी प्रक्रियेचा सामना करावा लागतो, तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल उचललं आहे. यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.

मुंबईसह आजूबाजूच्या भागात ही योजना लागू केली गेली आहे आणि लवकरच राज्यभर पसरवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे, तेही ०% व्याजदराने. महिलांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी मिळेल.

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेत दरमहिन्याला १५०० रुपये DBT अंतर्गत थेट खात्यात जमा केले जातात. लवकरच हे अनुदान २१०० रुपयांवर नेण्याची घोषणा अपेक्षित आहे. या अनुदानातून कर्जाची हप्ते वसूल केली जातील. योजनेसाठी आतापर्यंत १,१२,७०,२६१ अर्ज आले आहेत, ज्यापैकी १,०६,६९,१३९ अर्ज मंजूर झाले आहेत.

Comments are closed.