फार्मसी 3 हजार जागा कमी!-3,000 Pharmacy Seats Reduced!

3,000 Pharmacy Seats Reduced!

यंदा फार्मसी प्रवेश प्रक्रियेत (Pharmacy Admission) मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. कारण फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (PCI) नियम न पाळणाऱ्या ८९ संस्थांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढलं आहे. त्यातून बी. फार्म आणि डी. फार्मच्या ९२ संस्था आणि ३,२४७ जागा कमी झाल्या आहेत.

3,000 Pharmacy Seats Reduced!जागा कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढणार आहे आणि महाविद्यालयांचा कट-ऑफ देखील जास्त होण्याची शक्यता आहे.

नोंदणी आकडेवारी:

  • डी. फार्मसाठी: ३५,५३५ विद्यार्थ्यांनी अर्ज, ६०७ संस्थांमध्ये ३७,८९५ जागा

  • बी. फार्मसाठी: ५२,४६६ विद्यार्थ्यांनी अर्ज, ५०१ संस्थांमध्ये ४०,७१० जागा

गेल्या वर्षी तुलनेत:

  • बी. फार्म: ५१५ संस्थांत ४१,२८२ जागा, १२,७१४ रिक्त

  • डी. फार्म: ६८५ संस्थांत ४०,५७० जागा, १२,४०४ रिक्त

यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या उपलब्ध जागांपेक्षा जास्त असल्याने स्पर्धा आणि चुरस मोठ्या प्रमाणावर राहणार आहे.

Comments are closed.