सार्वजनिक बांधकाम खात्यात मेलबिगारी पुन्हा हवी!-Bring Back Melbigari!

Bring Back Melbigari!

सार्वजनिक बांधकाम खात्यात ग्रामपातळीवर काम करणारे मेलबिगारी कामगार ह्यांची पदं रद्द झाल्यापासून गावाकडच्या रस्त्यांची स्थिती फारच वाईट व्हायला लागली हाय. खड्डे पडले की आधी लगेच माती टाकून बुजवणारे कामगार आज नाहीत, म्हणूनच अनेक ठिकाणी महिन्योनमहिने खड्डे तसंच दिसतायत.

Bring Back Melbigari!मेलबिगारी म्हणजे फक्त खड्डे बुजवणं नव्हे, तर झाडांना पाणी घालणं, झाडांची निगा राखणं, फलक दुरुस्त करणं, दिशादर्शक दगड नीट ठेवणं – असं बरंच काही ते करत असत.

आज त्यांच्या अनुपस्थितीत ना खड्डे भरले जातायत, ना झाडं वाचतायत. झाडाझुडपात लपलेले फलक आणि वाहतुकीची दिशाभूल होऊन अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय.

मेलबिगारी हे रस्त्यावरचे शिपाई होते, रस्त्यांचे खरे रक्षक होते! त्यांच्या मेहनतीमुळेच रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई दिसायची, खड्डे कमी असायचे, आणि अपघातही टळायचे.

आज या पदांमुळे केवळ रोजगार नाही, तर रस्त्यांची सुरक्षा, पर्यावरण रक्षण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी मेलबिगारी गरजेचे झालेत. त्यामुळे शासनानं ही पदं पुन्हा सुरू करून भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी साऱ्यांकडून मागणी केली जात हाय.

Comments are closed.