राज्य सरकाराच्या विविध खात्यांमध्ये तब्बल २ लाख ९७ हजार ८५९ पदं अजूनही रिक्त आहेत! ही सगळी पदं लवकरच भरली जाणार हाय, असं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत सांगितलं.
शेलार म्हणाले, १५० दिवसांचा “सेवाकर्मी कृती आराखडा” पूर्ण झाल्यानंतर महाभरतीच्या माध्यमातून ही भरती राबवली जाणार हाय.
१५ जून २०२५ पर्यंतच्या आकड्यांनुसार, सेवार्थ प्रणालीतून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये २.९२ लाख जागा रिक्त होत्या आणि त्यात सेवानिवृत्तीच्या ५,२८९ जागा मिळवून एकूण २.९७ लाख जागा अजून भरायच्या आहेत.
मुख्यमंत्री सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत, प्रत्येक शुक्रवारी विभागनिहाय सुधारित आकृतीबंधाचा आढावा घेतलाजातो. त्यामुळे कोणत्या खात्यात किती पदं रिक्त आहेत, याचं नेमकं चित्र समोर येतंय.
‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गातील पदं कंत्राटी पद्धतीने भरता येत नाहीत, फक्त ‘ड’ वर्गाच्या काही पदांमध्ये ती सुविधा असते. मात्र अनुकंपा तत्वावरील ड वर्गातील पदंही कंत्राटीने भरली जात नाहीत, असं स्पष्ट केलं गेलंय.
