UPI साठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली लागू!!

UPI Transactions: 'Automated Chargeback' System Launched!!

0

यूपीआयच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारात अडचणी येणे, ट्रान्झेक्शन फेल होणे किंवा इंटरनेट समस्यांमुळे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. यासाठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली भारतभर लागू करण्यात आली आहे. स्वयंचलित चार्जबॅक प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२५ पासून लागू झाली असून, युजर्सना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

UPI Transactions: 'Automated Chargeback' System Launched!!

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फेल झालेल्या व्यवहारांमधून गेलेले किंवा अडकलेले पैसे त्वरित परत मिळवण्यासाठी चार्जबॅक प्रक्रिया स्वयंचलित केली आहे. युजर्सच्या तक्रारींचा विचार करून NPCI ने प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे चार्जबॅक प्रक्रिया जलद होईल आणि युजर्सला अनावश्यक त्रास सहन करावा लागणार नाही.

चार्जबॅक आणि रिफंडमधला फरक काय?
चार्जबॅक आणि रिफंड ही दोन्ही प्रक्रिया ग्राहकांनी केलेल्या व्यवहाराची रक्कम परत मिळवण्यासाठी असतात. पण दोन्हीमध्ये काही फरक आहे.
रिफंड: ग्राहकाला सेवा पुरवणाऱ्या एजन्सीकडे पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो.
चार्जबॅक: यात ग्राहकाला त्याच्या बँकेकडे अर्ज करावा लागतो, ज्यात त्या व्यवहाराची तपासणी करून पैसे परत मिळवण्याची विनंती केली जाते.

पैसे कसे परत मिळतील?
व्यवहार फेल झाल्यास किंवा पैसे अडकल्यास आता युजरला अनेक दिवस थांबावे लागणार नाही. यासाठी बँकेकडे तक्रार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या बँकेकडून चार्जबॅकची विनंती तत्काळ प्रक्रिया केली जाईल. यामुळे रिफंड प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल, आणि पैसे त्वरित तुमच्या खात्यात जमा होतील.

तक्रार कोठे करावी?
यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तुम्ही टोल फ्री क्रमांक 18001201740 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

चार्जबॅक का केला जातो?
जर कोणत्याही कारणामुळे व्यवहार अपूर्ण राहिला, तर त्याचे पैसे ग्राहकांना परत मिळतात. सामान्यतः तांत्रिक अडचणी किंवा फसवणूक झाल्यास चार्जबॅक प्रक्रिया केली जाते.
इंटरनेट समस्यांमुळे व्यवहार पूर्ण न होणे, एकाच व्यवहाराची वारंवार पैसे कटा जाणे, किंवा फसवणुकीमुळे पैसे परत मिळवताना चार्जबॅकची प्रक्रिया केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.