गेल्या वर्षी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी धावपळ करणाऱ्या अनेक महिलांनी आता मात्र स्वतःहूनच योजना सोडण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यात तब्बल ९७० महिलांनी लाभ नाकारला असल्याचं महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.
राज्य सरकारनं २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. दरमहा ₹१५०० बँकेत जमा होत होता. मात्र, आता अनेक महिलांनी ही योजना सोडण्यामागे एकच कारण दिलंय – “अपात्र असूनही चुकून अर्ज केला होता.”
यामागचं खरं कारण म्हणजे – काही महिलांना संजय गांधी निराधार योजना अधिक फायदेशीर वाटत आहे. ती योजना वयमर्यादा न ठेवता दीर्घकालीन लाभ देते. म्हणूनच अनेक जणी आता लाडकी योजना सोडून संजय गांधी योजनेत यायचा विचार करत आहेत.
सरकारनं अंगणवाडी सेविकांना घराघरात जाऊन पडताळणीचे आदेश दिले आहेत. ज्या महिलांनी चुकीने अर्ज केला, त्यांना विनाचौकशी कारवाई होऊ नये म्हणून स्वतःहून लाभ सोडण्याचं आवाहनही केलं आहे.

Comments are closed.