सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागामार्फत घेतलेल्या ४०व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (SET) निकाल ३० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर होणार असल्याचं विद्यापीठाच्या सेट विभागानं स्पष्ट केलं आहे.
ही परीक्षा १५ जून २०२५ रोजी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील एकूण १८ शहरांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निकालाबाबत गेले काही महिने उमेदवार मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर विद्यापीठाने निकालाची तारीख निश्चित करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचं काम केवळ परीक्षा घेण्यापुरतं मर्यादित नसून, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे निकाल वेळेत आणि अचूक स्वरूपात उमेदवारांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ३० ऑगस्टपासून उपलब्ध होईल. त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ पाहावं, असं आवाहनही विभागाकडून करण्यात आलं आहे.

Comments are closed.