१२ प्रश्न रद्द, संताप!-12 Cancelled, Chaos!

12 Cancelled, Chaos!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या गेलेल्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४’ मध्ये तब्बल १२ प्रश्न रद्द करण्यात आलेत आणि दोन प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आलेत. आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्नांमध्ये फेरफार झाल्याचं समोर आलंय.

12 Cancelled, Chaos!ही परीक्षा २९ जून २०२५ ला झाली होती आणि त्यानंतर आयोगानं प्राथमिक उत्तरतालिका जाहीर केली होती. त्यावर उमेदवारांनी भरपूर हरकती दाखल केल्यात. त्या हरकती आणि तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरतालिका आता जाहीर झालीय. पण या उत्तरतालिकेवर कोणतीही चर्चा होणार नाही आणि काहीही बदल होणार नाही, हे आयोगानं स्पष्ट केलंय.

पण एवढं सगळं घडल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय. अनेकजण म्हणतात की, “परीक्षा आम्ही दिली, अभ्यास आम्ही केला, पण आयोगाच्या चुकांसाठी पुरावे आम्हालाच शोधायचे का?”

इतकंच नव्हे तर, हे सगळं प्रकार आयोगाच्या नीतिमत्तेवरही प्रश्नचिन्ह उभं करतोय. जिथं तज्ज्ञ मंडळी समोर पुस्तकं ठेवूनसुद्धा चुकतायत, तिथं आयोगाची पारदर्शकता कुठं आहे, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करतायत.

रद्द झालेले प्रश्न (एकूण १२)
पेपर १

  • मराठी – ३

  • इंग्लिश – २

पेपर २

  • गणित व बुद्धिमत्ता – ३

  • रिमोट सेन्सिंग – १

  • भूगोल – १

  • इतिहास – १

  • राज्यशास्त्र – १

पर्याय बदलेले प्रश्न – इंग्लिश: २

विद्यार्थ्यांचे आरोप काय?

  • फक्त विद्यार्थ्यांकडूनच नैतिकतेच्या अपेक्षा का? आयोगाने स्वतःच्या कामात प्रामाणिकपणा दाखवावा.

  • उत्तरतालिका येईपर्यंत विद्यार्थ्यांना श्वास रोखून बसावं लागतं.

  • रद्द प्रश्नांमुळे गुणांमध्ये मोठी उलथापालथ होते, ज्याचा फटका गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बसतो.

  • आयोगाचे तज्ज्ञ जर चुका करत असतील आणि विद्यार्थ्यांनीच त्या सुधाराव्या लागत असतील, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

Comments are closed.