सैनिको मुला-मुलींसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, वीर पत्नीच्या पाल्यांना व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे ३० जूनपर्यंत अर्ज जमा करणे आवश्यक आहे.
आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना वसतिगृहात सवलतीच्या दरात निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, बौर पत्नीच्या पाल्यांना व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहामध्ये निःशुल्क भोजनाची व निवासाची सोय उपलब्ध आहे. तरी ज्या आजी व माजी सैनिकांचे तसेच सैनिक विधवांचे व वीर पत्नीचे पाल्य सोलापूर येथील शैक्षणिक संस्थेत आठवी ते पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत, त्यांना याचा लाभ मिळणार आहे. खासगी शिकवणीमध्ये प्रवेश हा प्रथम घेतलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचे सैनिकी मुला मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश हा प्रथम प्राधान्य म्हणून पाल्याचा प्रवेश त्याच जिल्ह्यात, शहरात शाळा किंवा महाविद्यालयामध्ये घेतलेला असावा.