मिरा-भाईंदर महापालिकेच्या हिंदी, मराठी, उर्दू आणि गुजराती शाळांमधल्या इयत्ता ८वी ते १०वीतील मुलींना दर महिन्याला ₹३०० उपस्थिती भत्ता दिला जाणार आहे. मुलींची शाळा सोडण्याची संख्या वाढतेय, हे लक्षात घेऊन हा निर्णय प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी घेतलाय.
पालिकेच्या आकडेवारीनुसार ८वी ते १०वीत मुलींच्या गळतीचं प्रमाण ३६% पेक्षा जास्त आहे.
घरखर्च, मजुरी, किंवा लवकर लग्नं होणं — अशा अडचणींमुळे शिक्षण सोडलं जातंय.
या योजनेत:
७५% हजेरी अनिवार्य
भत्ता थेट बँक खात्यात जमा
एकूण खर्च ₹१५ लाख – महिला व बालकल्याण विभागामार्फत
याशिवाय महापालिकेकडून मुलांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य वगैरेही दिलं जातंय.
“मुली शिक्षणात टिकल्या पाहिजेत, यासाठी सगळी मदत केली जाईल”, असं आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितलं.

Comments are closed.