रेल्वे टेक्निशियन भरती २०२५ – ६,२३८ पदांची मोठी संधी! RRB मार्फत भरती प्रक्रिया सुरू; मुंबई विभागात ८९१ जागा उपलब्ध! | Railway Technician Jobs! 6,238 Posts Open!

Railway Technician Jobs! 6,238 Posts Open!

रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखालील रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत देशभरातील इच्छुक उमेदवारांसाठी ६,२३८ टेक्निशियन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २७ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ही भरती RRB च्या ३० विभागांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) व टेक्निशियन ग्रेड-III (ओपन लाईन) या दोन मुख्य श्रेणींमध्ये ही भरती होणार आहे.

Railway Technician Jobs! 6,238 Posts Open!

टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) या श्रेणीअंतर्गत एकूण १८३ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये मुंबई RRB अंतर्गत ३९ जागा उपलब्ध असून, यामध्ये माजी सैनिक व अपंग उमेदवारांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. पात्रतेसाठी उमेदवारांनी बी.एस्सी. (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा/पदवी आवश्यक आहे.

टेक्निशियन ग्रेड-III (ओपन लाईन) या श्रेणीमध्ये सर्वाधिक ६,०५५ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मुंबई विभागासाठी एकट्या ८५२ जागा आरक्षित असून यामध्ये देखील विविध प्रवर्गातील माजी सैनिक व अपंगांसाठी आरक्षण आहे. या पदांसाठी पात्रता म्हणून उमेदवारांनी १०वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेडमधील ITI किंवा अ‍ॅक्ट अ‍ॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी लागते.

मुंबई RRB अंतर्गत टेक्निशियन ग्रेड-III मध्ये विविध ट्रेडनुसार पदविभाग करण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल, वेल्डर, फिटर, कारपेंटर, मशिनिस्ट, ट्रक मशीन, रेफ्रिजरेशन, पेंटर, ट्रिमर, ब्रिज फिटर, डिझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, क्रेन ऑपरेटर, ट्रिमर इत्यादी ट्रेडचा समावेश आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या फिटर (PU वर्कशॉप) साठी २४० पदे, इलेक्ट्रिकल/टीआरएस साठी १४९ पदे, वेल्डर साठी ४० पदे उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे एस अँड टी पदासाठी (पद क्र. १५) १२ वी (फिजिक्स व मॅथ्स) विषयांसह उत्तीर्ण असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर अर्ज करू शकतात. ही भरती संपूर्ण देशातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

वयोमर्यादा – टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल साठी उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गाला वयोमर्यादेत सवलती आहेत.

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल:

  • कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT)
  • कागदपत्र पडताळणी
  • मेडिकल चाचणी

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जुलै २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.rrbmumbai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा.

ही भरती प्रक्रिया रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वे क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळविण्याची ही संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता तयारीसह अर्ज करणे अत्यावश्यक आहे.

Comments are closed.