सरकारी कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी परीक्षा दयावी लागणार !-Promotion? Exam Needed!
Promotion? Exam Needed!
नव्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारनं मोठे बदल सुचवलेत. सरकारी कर्मचाऱ्यांना आता फक्त वरिष्ठतेवर नाही, तर पदोन्नतीसाठी ऑनलाईन कोर्स पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे.
वेतनवाढ आणि पदोन्नतीसाठी परीक्षा लागू शकते, असा विचार सरकार करत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता डिजिटल अभ्यासक्रम पूर्ण करून त्यामध्ये यश मिळवणं गरजेचं राहणार.
हे अभ्यासक्रम ‘कर्मयोगी’ पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं घेतले जाणार असून, सेवाकालाच्या विशिष्ट टप्प्यानुसार ६ कोर्सेस निश्चित करण्यात आले आहेत.
या कोर्सेसमधून कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होणार असून, त्या आधारे पदोन्नतीचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नवीन वेतन आयोगात केवळ अनुभव नव्हे, तर कौशल्य व मूल्यांकन हाही आधार असेल.
सरकारचं म्हणणं आहे की, ह्या बदलांमुळे शासन यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देता येईल.
थोडक्यात, आता सरकारी नोकरीत प्रगतीसाठी ‘परीक्षा’ ही नव्यानं केंद्रस्थानी येणार आहे!

Comments are closed.