फार्मसी पदवीत प्रवेशाची मेगा संधी!-Pharmacy Degree Admissions Open!

Pharmacy Degree Admissions Open!

जवळपास चार महिन्यांनंतर फार्मसी पदवी अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश फेरी सुरू झाली आहे. या फेरीत २९,१६६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यातील १३,८९५ विद्यार्थ्यांना पहिली पसंती मिळाल्याने प्रवेश ‘ऑटो फ्रिज’ झाला आहे.

Pharmacy Degree Admissions Open!त्यामुळे मागील काही महिन्यांपासून वाट पाहत बसलेल्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे.

औषधनिर्माणशास्त्र संस्थांना दरवर्षी PCI कडून मान्यता घ्यावी लागते. यंदा ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत चालल्यामुळे CET निकालानंतर विद्यार्थ्यांना चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागले. मान्यता मिळाल्यानंतर CET कक्षाने पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली.

महत्त्वाच्या तारखा:

  • पहिल्या फेरीनंतर रिक्त जागांचा तपशील: ७ ऑक्टोबर

  • दुसऱ्या फेरीसाठी पसंतिक्रम भरण्याची वेळ: ८ ते १० ऑक्टोबर

  • दुसरी फेरी जाहीर: १३ ऑक्टोबर

पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी ४४,२८७ जागा उपलब्ध असून, राज्यभरातून ५५,११६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यातील ३८,४६२ विद्यार्थ्यांनी पसंतिक्रम भरला होता.

प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ६ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाइन प्रवेश स्वीकारावा, आणि नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

Comments are closed.