फेलोशिप त्याच्या २५व्या वर्षात चालू आहे, जिथं NVIDIA दरवर्षी देशोदेशीतील PhD विद्यार्थ्यांकडून त्यांच्या रिसर्च प्रोजेक्टसाठी अर्ज मागवतं. निवड शैक्षणिक गुणवत्ता, प्राध्यापकांची शिफारस, आणि संशोधन क्षेत्रावर आधारित केली जाते.
AI, रोबोटिक्स, स्वयंचलित वाहनं आणि इतर उन्नत तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य. निवडलेले उमेदवार NVIDIA सोबत जवळून काम करतात, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत त्यांच्या संशोधनाला नवे आयाम मिळवून देतात. याशिवाय, फेलोशिपमध्ये एक अनिवार्य समर इंटर्नशिप (NVIDIA च्या US, कॅनडा, जर्मनी, स्वीडन, फिनलंड, स्वित्झर्लंड, इस्रायल आणि तैवान येथील ऑफिसमध्ये) देखील आहे.
फायदे:
$60,000 पर्यंत आर्थिक मदत
NVIDIA चं अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधन साधनं वापरण्याची संधी
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच उद्योगात नावलौकिक मिळवण्याची संधी
पात्रता:
PhD चा पहिला वर्ष पूर्ण असलेला विद्यार्थी
Computer Science, Engineering, System Architecture किंवा संबंधित क्षेत्रातील विद्यार्थी
2026-27 मध्ये पूर्णवेळ PhD विद्यार्थी असणं गरजेचं (म्हणजे मे/जून 2027 पूर्वी पदवी मिळू नये)
समर इंटर्नशिप पूर्ण करण्याची तयारी
NVIDIA कर्मचारी यांचे जवळचे नातेवाईक अर्ज करू शकत नाहीत
देणगी थेट विद्यापीठाकडे पाठवली जाईल
अर्ज प्रक्रियेचं सार:
रिसर्च प्रपोजल – २ पानं (बिब्लिओग्राफी वेगळी)
CV/Resume
२ ते ३ शिफारस पत्रं (एक प्रोजेक्ट गाईडकडून अनिवार्य)
समर इंटर्नशिपसाठी तयारीची पुष्टी
शेवटची तारीख:
१५ सप्टेंबर २०२५ | दुपारी ३ वाजेपर्यंत (Pacific Time)
शिफारसपत्रं – १२ वाजेपर्यंत
🔗 अर्ज लिंक:
👉 येथे क्लिक करा आणि अर्ज करा

Comments are closed.