धुळे जिल्ह्यात साक्री रोडवर सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात नविन १०० खाटांचं स्त्री रुग्णालय उभं राहतंय. आता या रुग्णालयाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय, आणि थोड्याच दिवसांत ते सुरु होणार हाय.
इथं शहरासोबत आजूबाजूच्या खेड्यांतील महिलांना, विशेषतः गरोदर मातांना मोठा फायदा होणार हाय. डॉ. देगावकर आणि डॉ. सांगळे यांनी हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु व्हावं म्हणून खूप मेहनत घेतलिय.
या नव्या इमारतीत एकून १०० खाटांची सुविधा मंजूर हाय. त्यात १० खाटांचं ICU आणि १२ नवजात बालकांसाठी NICU युनिटसुद्धा उभारण्यात आलंय. यामुळे आता गंभीर रुग्णांवर धुळ्यातच शस्त्रक्रिया होणार, आणि भाऊसाहेब हिरे हॉस्पिटलवरचा ताणही कमी होईल.
फायर ऑडिटचा शेवटचा टप्पा चालू हाय, परिसरात लाईट्स बसवले जातायत. एकदा हे सगळं पूर्ण झालं की रुग्णालय कार्यान्वित केलं जाईल, असं व्यवस्थापनानं सांगितलं.

Comments are closed.