नाशिक बाजार समिती नोकर भरतीची उठविली स्थगिती; तक्रार योग्य नसल्याचे अहवालात नमूद – Nashik Market Committee Bharti

0

बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बेरोजगारांना तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले होते. मात्र, संचालक शिवाजी चुंभळे यांनी संबंधित भरती प्रक्रिया चुकीची असल्याची तक्रार राज्य शासनाकडे केली असता तातडीने चौकशी करून भरतीला स्थगिती दिली होती. त्याअनुषंगाने शासनाने संबंधित भरती प्रक्रियेची चौकशी केली. त्यामध्ये चुंभळे यांनी केलेली तक्रार योग्य नसून असे चौकशीत समोर आले आहे. तशी नोंद अहवालात करण्यात आली असून, नोकर भरती स्थगिती उठवण्यात आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची नोकरभरती बाजार समिती कायद्यातील तरतुदी , शासनाकडील परिपत्रकीय आदेश आदींचा भंग करणारी आहे . त्यामुळे बाजार समितीची नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंभळे यांनी पणन मंत्र्यांकडे केली होती.

 

यावर तातडीने पणन संचालकांनी आदेश काढून स्थगिती दिली होती. त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करून अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेशित करण्यात आले होते. ही भरती सरळसेवा प्रक्रिया पारदर्शक होत असल्याचा अहवाल विभागीय सहनिबंधकांनी तयार केलेल्या त्रिसदस्य चौकशी समितीने पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधक यांना कळविला आहे.

तसेच अहवालात सदर भरती प्रक्रिया विरोधात केलेली चुंभळे यांची तक्रार योग्य नाही असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी उचित नसल्याचा स्पष्ट आदेश दिला आहे. त्यामुळे बाजार समितीची भरती होत असल्याने इच्छुक बेरोजगारांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.

माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंभळे यांनी केलेली तक्रार केली होती. मात्र , शासनाने स्थगिती देत चौकशी समिती गठित करीत अहवाल सादर केला. यात तक्रार योग्य नसल्याच निर्वाळा देण्यात आला आहे. शासनाच्या अहवालातूनच बाजार समितीत झालेली भरती प्रक्रिया योग्य असे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.