महिलांसाठी नोकरीची संधी ; शिक्षक व कृषी विभागात ! लगेच जाणून घ्या

Growing Opportunities for Women in Teaching & Agriculture!

0

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबत अनेक उमेदवार उत्सुक आहेत. मात्र, काही संस्थांना जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने पवित्र पोर्टलवरील जाहिरातींसाठी मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती होण्याची संधी निर्माण झाली आहे.

Growing Opportunities for Women in Teaching & Agriculture!

या निर्णयाचे जिल्हा परिषद मागासवर्गीय माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

भरती प्रक्रियेत वेग

  • २० जानेवारीपासून पोर्टल आणि व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
  • २८ फेब्रुवारीपर्यंत १,७१२ व्यवस्थापनांनी आणि विविध माध्यमांसाठी १,९०२ जाहिराती जाहीर केल्या.
  • काही संस्थांनी बिंदूनामावली प्रमाणित करण्यासाठी मागासवर्गीय कक्षात प्रस्ताव दिले आहेत, परंतु प्रमाणिकरण प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने मुदतवाढ देण्याची गरज भासली.

कृषी विभागातील महिला अधिकारी वाढत्या संख्येने कार्यरत
कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा विभाग आहे. सध्या राज्यात कृषी विभागात एकूण १९,२४० अधिकारी-कर्मचारी कार्यरत असून, त्यातील ५,५५१ महिला कर्मचारी आहेत. त्यामुळे विभागात महिलांचे योगदान लक्षणीय वाढत आहे.

संवर्गनिहाय महिला कर्मचारींची संख्या:

  • गट अ: ५७ (१४.८१%)
  • गट ब: ४७६ (१९.८३%)
  • गट क: ४,७५९ (३०.८२%)
  • गट ड: २५९ (२५.५९%)

कृषी शिक्षण घेतलेल्या महिलांसाठी एमपीएससी आणि कृषी सेवक भरतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. अनेक महिला कृषी विभागातील विविध योजनांमध्ये कार्यरत असून, शेतकऱ्यांसाठी काम करण्यास तत्पर आहेत.

“शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर” – पूनम खटावकर, कृषी उपसंचालक, शेतकरी मासिक

Leave A Reply

Your email address will not be published.