Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
ही परीक्षा 5, 18, 19, 26 एप्रिल तसेच 2 मे 2026 रोजी होणार असून पात्र उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र ऑनलाईन खात्यातून डाउनलोड करणे आवश्यक आहे.
परीक्षेला बसताना उमेदवारांनी संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले आणि प्रिंट केलेले मूळ प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
आयोगाने विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. परीक्षा दिवशी संभाव्य अडचणी जसे की वाहतूक समस्या, मोर्चे किंवा हवामानातील बदल लक्षात घेऊन उमेदवारांनी किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
ही परीक्षा राज्यातील महत्त्वाच्या भरती प्रक्रियेचा भाग असून, उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक पाळणे गरजेचे आहे. योग्य तयारीसोबतच वेळेचे नियोजन केल्यास परीक्षा व्यवस्थित पार पाडता येईल.

Comments are closed.