MPSC मुख्य परीक्षा 2025 प्रवेशपत्र जाहीर! वेळेआधी पोहोचणे अनिवार्य! | | MPSC 2025: Admit Card Released, Reach Early!

MPSC 2025: Admit Card Released, Reach Early!

Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत आयोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी प्रवेशपत्रे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. ही परीक्षा ५, १८, १९ व २६ एप्रिल 2026 तसेच २ मे 2026 रोजी घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांची प्रवेशपत्रे आयोगाच्या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MPSC 2025: Admit Card Released, Reach Early!

उमेदवारांनी https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे. परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी प्रिंट केलेले मूळ प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य असून, त्याशिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षा देण्यास परवानगी दिली जाणार नाही.

आयोगाने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. परीक्षा दिवशी उद्भवू शकणाऱ्या वाहतूक कोंडी, आंदोलन, मोर्चे किंवा हवामानातील अडचणी लक्षात घेऊन उमेदवारांनी किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उमेदवारांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे, अन्यथा परीक्षेची संधी गमवावी लागू शकते.

Comments are closed.