दिव्यांग शिष्यवृत्तीला मोठी वाढ-Scholarship Boost for Disabled Students!

Scholarship Boost for Disabled Students!

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत शिष्यवृत्तीमध्ये तब्बल १२ वर्षांनंतर भरीव वाढ जाहीर करण्यात आली.

Scholarship Boost for Disabled Students!दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या ३४ वर्ष जुन्या योजनांमध्ये बदल करून, Rights of Persons with Disabilities Act, 2016 नुसार अधिक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन दरानुसार शिशुवर्ग ते आठवीसाठी ₹५००, नववी-दहावी ₹६०० ते ₹८०० आणि अकरावी-बारावी ₹८०० ते ₹१००० प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यापूर्वी ही रक्कम फक्त ₹१००–₹२०० इतकी होती.

याशिवाय अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक भत्ता आणि अभ्यास दौऱ्यासाठी आर्थिक मदतही दिली जाणार असून, या योजनेसाठी सुमारे ₹२३ कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

Comments are closed.