मोदी सरकारकडून मेगा भरतीची घोषणा – ४८८७ पदांसाठी सुवर्णसंधी, दहावी पास ते पदवीधरांना अर्जाची संधी! | Modi Govt Announces Mega Recruitment – 4,887 Vacancies!

Modi Govt Announces Mega Recruitment – 4,887 Vacancies!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सत्तेत ११ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या कालावधीत रोजगार निर्मितीवरून सरकारवर अनेकदा आरोप झाले. सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलेल्या मोदी सरकारने रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली. त्याच अनुषंगाने आता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली असून, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवक-युवतींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

Modi Govt Announces Mega Recruitment – 4,887 Vacancies!

ही भरती प्रक्रिया केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत राबवली जात असून, एकूण ४८८७ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी दहावी पास उमेदवारांनाही संधी उपलब्ध असून, उच्चशिक्षित पदवीधरही अर्ज करू शकतात. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच अल्पशिक्षित तरुणांसाठीही ही एक मोठी संधी आहे.

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, उमेदवार देशाच्या कोणत्याही भागातून सहज अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून, १७ ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अर्ज नाकारला जाईल.

या भरतीत सिक्युरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ह ही दोन प्रमुख पदे भरली जाणार आहेत. पात्रतेसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून मिळालेलं दहावीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते २६ वर्षे निश्चित करण्यात आली असून, आरक्षण प्रवर्गानुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी http://www.mha.gov.in/en/notifications/vacancies या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. याच ठिकाणी भरतीसंबंधी सर्व सविस्तर माहिती, अटी आणि नियम उपलब्ध आहेत. सरकारी नियमानुसार आरक्षण लागू राहणार आहे आणि त्यानुसारच पदांचे वाटप केले जाईल.

अर्ज शुल्क महिलांसाठी ₹५५० तर पुरुष उमेदवारांसाठी ₹६५० निश्चित करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेत मुलाखत, व्यक्तिमत्त्व चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी या टप्प्यांचा समावेश असेल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केलेल्या उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती मिळेल.

रोजगाराच्या संधींच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही भरती प्रक्रिया एक मोठी पायरी ठरू शकते. केंद्र शासनाच्या नोकरीत स्थैर्य, विविध भत्ते आणि सेवा सुविधांचा लाभ मिळणार असल्याने, या पदांसाठी स्पर्धा प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रियेत सहभागी व्हावे.

सरकारच्या या मेगा भरतीमुळे रोजगाराच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दहावी पासपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वांना या प्रक्रियेत संधी असल्याने, लाखो उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका.

Comments are closed.