महिलांसाठी राज्य सरकारच्या विविध योजनांची यादी येथे बघा | List Of Mahila Yojana In Maharashtra

List Of Mahila Yojana In Maharashtra

0

List Of Mahila Yojana In Maharashtra: विघानसभा निवड निवडणुकीपूर्वी राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांसाठी राज्य सरकारने दरमहा दौड हजार रुपयांच्या मदतीपासून उच्च शिक्षणासाठी फी माफीपर्यंतच्या विविध प्रकारच्या योजनांची अक्षरशः लयलूट केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून त्याचा फायदा राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवाय राज्यातील ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ ही महिला वर्गाला सुखावणाऱ्या योजनेची घोषणा आज अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.

Mahila Yojana In Maharashtra
मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहेना’ या योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आज जाहीर केली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, अशी घोषणा केली असली तरी चालू आर्थिक वर्षात १० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यावसायिक शिक्षण घेणार्या मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे

Mahila Yojana In Maharashtra

महिलांसाठीच्या ठळक तरतुदी | महिलांसाठी राज्य सरकारच्या विविध योजनांची यादी येथे बघा 

  •  ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने ‘चा फायदा ५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंबांना होणार आहे. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार.
  • अंतरिम अर्थसंकल्पात महिलांच्या= स्वयंरोजगारासाठी ‘पिंक ई रिक्षा’ योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. या अर्थसंकल्पात या योजनेचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून १७ शहरातल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ८० कोटी निधी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
  • शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देणारे अनुदान १० हजार रुपयांवरुन २५ हजार रुपये करण्यात आले आहे.
  • महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी ‘युनिटी मॉल’ बांधण्यात येणार आहे.
  • सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची  सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
  • लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
  • ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ
  • महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
  • ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती
  • मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती

Yojana For Ladies in Maharashtra | Yojana For Girls In Maharashtra

Sr No Name Of Yojana For Girls in Maharashtra
1  बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)
2 माझी कन्या भाग्यश्री योजना
3 बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना
4 बाल संगोपन संस्था (सी सी आय)
5 अत्याचारग्रस्त पिडीत महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहूउद्देशीय महिला केंद्र
6  बाल संगोपन योजना (मुलांसाठी कौटुंबिक देखभाल)
7 काम करणार्‍या महिलांच्या मुलांकरीता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
8 इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
9 अनाथालय, महिला स्वीकृती केंद्रे आणि संरक्षित गृहे यामधील निराधार आणि परित्यक्ता विधवांच्या मुलींच्या विवाहाकरीता अनुदान
10  किशोरी शक्ति योजना
11 किशोरवयीन मुलींसाठी योजना
12 शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
13 देवदासी कल्याण योजना
14 एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस)

Leave A Reply

Your email address will not be published.