विद्यार्थ्यांना मिळणार घराजवळ दाखले; महा ई-सेवा केंद्रात मिळणार सुविधा | List Of Certificate Required For Admission in Maharashtra
List Of Certificate Required For Admission in Maharashtra
List Of Certificate Required For Admission in Maharashtra: बारावी आणि दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकाराचे दाखले लागतात. ते त्यांना वेळेत उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्ज झाले आहे. त्यासाठी सेतू केंद्रात न जाता विद्यार्थ्यांना घराजवळील महा ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महा ई-सेवा केंद्रात जाऊन अथवा ‘आपले सरकार’ या पोर्टलवरून दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
निकालानंतर शाळा, कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांची सेतू केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने प्रशासनाला दाखले देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातून नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांच्यात वाद होतात.
प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत दाखला मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्रांत हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी ऑनलाइन पद्धतीने दाखले देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आत्ताच दाखल्यांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्रात अकरावी प्रवेशासाठी कोणते प्रमाणपत्र आवश्यक आहे?
Essential Documents :
- Original Class 10th Mark Sheet
- School Leaving Certificate (SLC)
Documents Required for Category Students :
- Caste Certificate for SC, ST, VJ / NT, OBC, SBC
- Non-creamy Layer Certificate for VJ / NT, OBC, SBC
- EWS Eligibility Certificate
- Disability Certificate for Divyang/Disabled
- Collector’s Certificate for earthquake-affected individuals
- Parents’ Transfer Order and Joining Report
- Service Certificate for Defence Personnel
- Collector’s Certificate for Freedom Fighters
- Sports Certificate
- Orphan Certificate
आवश्यक कागदपत्रे – Documents Required after 12th For Admission
-
उत्पन्नाचा दाखला : अर्ज, स्व-घोषणापत्र, फोटो, विजेचे बिल, करपावती, रेशनकार्ड यापैकी एक, फॉर्म १६ किंवा तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला,
- वय-राष्ट्रीयत्व अधिवास दाखला : स्व-घोषणापत्र, फोटो, विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, रहिवासी पुराव्यासाठी विजेचे बिल अथवा महापालिकेची करपावती, आधारकार्ड
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र : स्व-घोषणापत्र, फोटो, लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, आधारकार्ड
-
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी प्रमाणपत्र : स्व-घोषणापत्र, फोटो, उत्पन्नाचे स्व-घोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, १९६७ पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विजेचे बिल, करपावती, आधारकार्ड
असे शोधा महा ई-सेवा केंद्र
घराजवळील महा ई-सेवा केंद्रामध्ये आता दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर महा ई-सेवा केंद्रातूनच दाखले देण्यात येणार आहे. या केंद्रांची यादी aapalesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर गेल्यावर ‘संपर्क’ यावर क्लिक केल्यावर आपला जिल्हा आणि तालुका निवडा. यामध्ये सर्व महा ई-सेवा केंद्रांची यादी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये केंद्राचा पत्ता, ई-मेल आयडी आणि फोन नंबर असेल. यावरून संबंधित अर्जदाराला जवळचे महा ई-सेवा केंद्र शोधता येणार आहे.
‘आपले सरकार’ पोर्टलवरूनही मिळणार दाखले
‘आपले सरकार’ या संकेतस्थळावरूनसुद्धा डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले ऑनलाइन मिळणार आहेत. यासाठी अर्जदाराने ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करणे आवश्यक आहे. आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज ऑनलाइन स्वीकारला जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराला मेलद्वारे व या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळतील.
दहावी-बारावीच्या निकालानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले लागतात. विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह महा ई-सेवा केंद्र अथवा सेतू केंद्रामार्फत अर्ज करावेत. वेळेत दाखले उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
Mala
MAHA ESEVA KENDRA IN AIROLI CHARGES 700 RS FOR DOMICILE
महा इ सेवा केंद्रात हे दाखले काढायला ,उत्पन्न दाखला-(पंचनामा असेल तर -१०००/रु )
आयकर विवरण पत्र / फॉर्म १६ असेल तर -५००रू ) आणि डोमिसाईल काढायला -५०० रु घेतात ( कोपर खैरणे , नवी मुंबई येथे सगळे महा इसेवा केंद्र वाले असेच पैसे घेतात .