एलआयसी भरती ८४१ जागा खुल्या!-LIC Jobs 841 Posts Open!

LIC Jobs 841 Posts Open!

भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) नोकरीचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी भन्नाट बातमी आहे. एलआयसीनं सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) आणि सहाय्यक अभियंता (AE) अशा एकूण ८४१ जागांसाठी भरती जाहीर केलीये.

LIC Jobs 841 Posts Open!अर्ज करण्याची वेळ:
१६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ दरम्यान अर्ज भरता येणार.

कोणासाठी ही संधी?
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर आणि अभियंत्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जाते. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर अधिसूचना वाचणं फार गरजेचं आहे. शेवटच्या क्षणी धावपळ नको, वेळेत अर्ज करा, असा सल्ला देण्यात आलाय.

LIC च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज प्रक्रिया पार पाडता येईल.

पदांची सविस्तर माहिती:

पदजागा
सहाय्यक अभियंता (AE)८१
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – स्पेशालिस्ट (AAO)४१०
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी – जनरलिस्ट (AAO)३५०

पात्रता व शुल्क:

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा:
पदांनुसार पात्रता व वयोमर्यादा वेगवेगळी आहे. अधिसूचनेत तपशील दिलेला आहे.

अर्ज शुल्क:

  • SC/ST/PwBD: ₹८५ + जीएसटी

  • इतर सर्व प्रवर्ग: ₹७०० + जीएसटी

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड ३ टप्प्यांत होणार:

  1. पूर्व परीक्षा (Prelims) – प्राथमिक निवड

  2. मुख्य परीक्षा (Mains) – पुढील फेरी

  3. मुलाखत (Interview) – अंतिम टप्पा

फायनल मेरिट लिस्ट फक्त मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या गुणांवर आधारित असेल. पूर्व परीक्षेचे गुण धरले जाणार नाहीत.

निवडीनंतर काय?

निवड झालेल्या उमेदवारांची Pre-Recruitment Medical Examination होणार आहे.

एकंदरीत, LIC मध्ये सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्याची ही एक भन्नाट संधी आहे – ती सोडू नका!

Comments are closed.