लाडकीचे हप्ते येतायत!-Ladki Bahin: Installment Soon!
Ladki Bahin: Installment Soon!
ऑक्टोबर आला तरीही लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचे ₹१५०० हप्ते अजून खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
योजनेतील लाभार्थी महिलांना लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत माहिती देतील.
सप्टेंबरचा हप्ता गेल्या काही महिन्यांपासून लांबणीवर जात आहे. येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, दिवाळीच्या काळात ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे.
योजनेत लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे. जर केवायसी केले नसेल, तर योजनेचा लाभ मिळणार नाही. केवायसी ऑनलाइन पद्धतीने करावी, तसेच प्रक्रिया कशी करायची याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Comments are closed.