ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ५०० जागांची भरती सुरु; फक्त पदवी, पगार ६२ हजार!-Just a Degree & Earn ₹62K!

Just a Degree & Earn ₹62K!

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनं २०२५ साठी सहाय्यक (वर्ग III) पदांसाठी भरती जाहीर केलीय. एकूण ५०० पदं रिक्त असून, उमेदवारांनी आपले अर्ज १७ ऑगस्ट २०२५ पूर्वी ऑनलाईन पद्धतीनं भरायचेत.

Just a Degree & Earn ₹62K!भरतीसंदर्भात माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.orientalinsurance.org.in वर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी खास संधी ठेवण्यात आली असून, राज्यासाठी ६४ जागा राखीव आहेत.

मुख्य माहिती (Important Info):

  • पद: सहाय्यक (Class III)

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

  • वयोमर्यादा: किमान २१, कमाल ३० (प्रवर्गानुसार सूट)

  • पदसंख्या: एकूण ५०० (महाराष्ट्र – ६४)

  • अर्ज शुल्क: सामान्य – ₹850, राखीव – ₹100

  • अर्ज सुरु: २ ऑगस्ट २०२५

  • शेवटची तारीख: १७ ऑगस्ट २०२५

पात्रता अटी:

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक

  • इंग्रजी विषयात पास असणे गरजेचे (१०वी/१२वी/पदवी)

  • स्थानिक भाषा (वाचता, लिहिता, बोलता) येणं गरजेचं

भरती प्रक्रिया:

  • परीक्षा टप्पे:

    • टप्पा १: प्राथमिक परीक्षा (Online Objective)

    • टप्पा २: मुख्य परीक्षा (Online Objective)

    • अंतिम टप्पा – कागदपत्रांची तपासणी

पगार:

सहाय्यक पदाचा पगार ₹22,405 पासून सुरू होतो आणि ७व्या वेतन आयोगानुसार विविध टप्प्यांनंतर तो ₹62,265 पर्यंत पोहोचतो. त्यात भत्तेही समाविष्ट आहेत.

Comments are closed.