ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनं २०२५ साठी सहाय्यक (वर्ग III) पदांसाठी भरती जाहीर केलीय. एकूण ५०० पदं रिक्त असून, उमेदवारांनी आपले अर्ज १७ ऑगस्ट २०२५ पूर्वी ऑनलाईन पद्धतीनं भरायचेत.
भरतीसंदर्भात माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.orientalinsurance.org.in वर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी खास संधी ठेवण्यात आली असून, राज्यासाठी ६४ जागा राखीव आहेत.
मुख्य माहिती (Important Info):
पद: सहाय्यक (Class III)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा: किमान २१, कमाल ३० (प्रवर्गानुसार सूट)
पदसंख्या: एकूण ५०० (महाराष्ट्र – ६४)
अर्ज शुल्क: सामान्य – ₹850, राखीव – ₹100
अर्ज सुरु: २ ऑगस्ट २०२५
शेवटची तारीख: १७ ऑगस्ट २०२५
पात्रता अटी:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक
इंग्रजी विषयात पास असणे गरजेचे (१०वी/१२वी/पदवी)
स्थानिक भाषा (वाचता, लिहिता, बोलता) येणं गरजेचं
भरती प्रक्रिया:
परीक्षा टप्पे:
टप्पा १: प्राथमिक परीक्षा (Online Objective)
टप्पा २: मुख्य परीक्षा (Online Objective)
अंतिम टप्पा – कागदपत्रांची तपासणी
पगार:
सहाय्यक पदाचा पगार ₹22,405 पासून सुरू होतो आणि ७व्या वेतन आयोगानुसार विविध टप्प्यांनंतर तो ₹62,265 पर्यंत पोहोचतो. त्यात भत्तेही समाविष्ट आहेत.

Comments are closed.