जामिया मिलिया इस्लामिया मध्ये मोफत UPSC कोचिंग! आजपासून अर्ज सुरू! | Jamia Free UPSC Coaching Applications Open!

Jamia Free UPSC Coaching Applications Open!

देशातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Jamia Millia Islamia येथे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेसाठी मोफत कोचिंगसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज, १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक घटक आणि सर्व प्रवर्गातील महिलांसाठी ही संधी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Jamia Free UPSC Coaching Applications Open!

नागरी सेवा (Civil Services) परीक्षेची मोफत तयारी करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून उमेदवारांनी आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करावा लागतो. अर्ज करताना १,३२५ रुपयांचे अर्ज शुल्क भरणे बंधनकारक आहे.

प्रवेश प्रक्रियेनंतर निवड झालेल्या उमेदवारांना ७,००० रुपयांची सुरक्षा ठेव (Refundable Deposit) जमा करावी लागेल. तसेच वसतिगृहाच्या देखभालीसाठी सुरुवातीला ६,००० रुपये (पहिल्या सहा महिन्यांसाठी) भरावे लागतील. त्यानंतर दर महिन्याला १,००० रुपयांची देखभाल फी द्यावी लागेल. याशिवाय भोजनासाठी दरमहा सुमारे २,५०० ते ३,००० रुपये खर्च अपेक्षित आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या मोफत कोचिंगचा लाभ घ्यावा.

Comments are closed.