इसरोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात (VSSC) विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल २०२५ आहे.
या भरतीत पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (भौतिकशास्त्र) पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांना ₹४७,६०० ते ₹१,५१,१०० पर्यंत वेतन मिळणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्या आणि अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एनसीईआरटीच्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून एम.एससी. पदवी किंवा भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, उपयोजित भौतिकशास्त्र, न्यूक्लियर भौतिकशास्त्र या विषयांमध्ये किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड. किंवा समकक्ष पदवी असणेही बंधनकारक आहे.
शिवाय, उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी भाषेत अध्यापन करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.