देशाच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणेत काम करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आलीय. इंटेलिजन्स ब्युरो (IB) म्हणजेच गुप्तचर विभागानं असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड-II/Executive पदांसाठी तब्बल ३७१७ पदांची भरती जाहीर केलीय.
ही भरती प्रक्रिया १९ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून, १० ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचं मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
१८ ते २७ वर्षे (आरक्षणानुसार सूट लागू).
अर्ज शुल्क:
ओपन/EWS/OBC पुरुष: ₹650
SC/ST/महिला: ₹550
निवड प्रक्रिया:
ऑब्जेक्टिव्ह परीक्षा (100 गुण) – सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, इंग्रजी
वर्णनात्मक परीक्षा (50 गुण) – निबंध व इंग्रजी आकलन
मुलाखत (100 गुण) – पात्र उमेदवारांना बोलावण्यात येईल.
अर्ज कसा कराल?
www.mha.gov.in या गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन, भरती लिंकवर क्लिक करून नोंदणी करा, अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रं व शुल्क अपलोड करून अर्ज सबमिट करा.

Comments are closed.