TWAS फेलोशिप 2025/2026 साठी अर्ज सुरु झालेत. ह्या फेलोशिपमुळे विकसनशील देशांमधल्या तरुण वैज्ञानिकांना स्वतःच्या देशाबाहेर दुसऱ्या विकसनशील देशात 3 ते 12 महिने संशोधन आणि प्रगत प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळते.
ही संधी विशेषतः अशा वैज्ञानिकांसाठी आहे जे संशोधन क्षेत्रात नवीन आहेत आणि जे भविष्यात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवू इच्छितात. TWAS विमान प्रवासासाठी कमी दरात तिकीट आणि दर महिन्याला कमाल $300 इतका खर्च देते.
राहण्याची व जेवणाची व्यवस्था होस्ट संस्था करणार. फेलोशिपसाठी पात्र होण्यासाठी MSc किंवा समकक्ष पदवी असावी लागते, अर्जदार विकसनशील देशात राहणारा व तिथल्या संस्थेत काम करणारा असावा.
वयाचं बंधन नाही, पण नव्या संशोधकांना आणि सर्वात कमी विकसित देशातील वैज्ञानिकांना प्राधान्य दिलं जातं. CAS (चायना) संस्थांमध्ये ही फेलोशिप लागू नाही. अर्ज करताना पासपोर्ट, पाच पानी CV, दोन शिफारस पत्रं, MSc ची प्रमाणपत्रं, मूळ संस्थेच्या प्रमुखांचं स्टेटमेंट आणि होस्ट संस्थेचं आमंत्रण पत्र ही कागदपत्रं लागतात. अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी वेबसाइटवर भेट द्या.

Comments are closed.