भूमित्र चॅटबॉट – नागरिकांसाठी भूमी अभिलेख सेवा सुलभ! | Bhumitra Chatbot – Easy Land Services!

Bhumitra Chatbot – Easy Land Services!

महत्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागाने नागरिकांसाठी भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. ही सेवा भूमी व्यवस्थापनाशी संबंधित नागरिकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे त्वरित देण्यास सक्षम आहे.

Bhumitra Chatbot – Easy Land Services!

२००२ पासून तंत्रज्ञानाचा व्यापक उपयोग
२००२ पासून महसूल विभागाने ७/१२ संगणकीकरण, मिळकत पत्रिका संगणकीकरण, भूमी नकाशांचे संगणकीकरण, तसेच भू-संदर्भीकरण यांसारख्या पायाभूत कामांची प्रगती केली आहे. यामुळे भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख झाले आहे.

नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा
‘महाभूमी’ संकेतस्थळावर आता नागरिक ७/१२, ८-अ, ई-चावडी, ई-हक्क, फेरफार अर्ज स्थिती, पीक पाहणी आणि महा भू-नकाशा यांसारख्या सुविधा वापरू शकतात. तसेच, ७/१२ डिजिटल स्वाक्षरी केलेला मिळवणे, फेरफार अर्जाची स्थिती तपासणे आणि भूमीशी संबंधित विविध माहिती घेणे आता सोपे झाले आहे.

भूमित्र चॅटबॉटची सुरुवात
‘डिमिस्टिफायिंग लँड रेकॉर्ड्स’ (भूमी अभिलेखांचे गूढ उकलणे) या संकल्पनेअंतर्गत ‘भूमित्र’ चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा मुख्यत्वे तीन तत्त्वांवर आधारित आहे – माहिती, सुविधा आणि सूचना.

शेतकऱ्यांसाठी विशेष मदत
सातबाराच्या संबंधित अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून सोप्या भाषेत आणि तत्काळ उत्तरे मिळतील. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर माहिती मिळविण्यात मदत होणार आहे आणि त्यांच्या शासकीय कामकाजाची प्रक्रिया अधिक सोपी होईल.

भविष्यकालीन सुधारणा
भविष्यात या सेवेमध्ये एआय (Artificial Intelligence) वापरता येईल का याबाबतही माहिती गोळा केली जात आहे. यामुळे चॅटबॉट अधिक बुद्धिमान होईल आणि नागरिकांना अधिक सुस्पष्ट माहिती देऊ शकेल.

व्हॉट्सॲपवरही सेवा उपलब्ध
सुधारित नियोजनानुसार, संकेतस्थळाव्यतिरिक्त व्हॉट्सॲपवर ही सेवा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे. यामुळे नागरिकांना सहजपणे मोबाईलवरूनही माहिती मिळू शकणार आहे.

प्रश्नसंच आणि सेवा कार्यप्रणाली
भूमित्र चॅटबॉटमध्ये सध्या जमीन व्यवस्थापनाशी संबंधित २७३ प्रश्नांचा संच तयार करण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तत्काळ मिळवता यावी आणि भूमी अभिलेखांची पारदर्शकता सुनिश्चित होावी, या उद्देशाने ही सेवा कार्यरत आहे.

Comments are closed.