गोव्यात राजकीय हलचल!-Goa Political Buzz!

Goa Political Buzz!

एनआयओचा जो एक अहवाल होता, तो गोव्याच्या विरोधात गेला हाय. त्यामुळे तो कर्नाटकाला फायदेशीर ठरेल, असं आमदार वीरेश बोरकर म्हणाले. जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली का, यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा द्यावा, अशी मागणी झाली.

Goa Political Buzz!▪️ भोम पंचायतीत सत्तांतर:
भोम-अडकोणमध्ये सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव एक विरुद्ध ६ मतांनी मंजूर झाला. प्रियोळ मतदारसंघातील तिन्ही पंचायतीत राजकीय चलबिचल सुरू हाय.

▪️ ओबीसी मंत्र्यांचा अभिमान:
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री आहेत, हे अभिमानाचं. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापलं आहे.”

▪️ टोपीवरून राजकीय टोलेबाजी:
सभापतीपदावर चर्चा सुरू असताना आमदार दाजी साळकरांच्या घातलेल्या ‘टोपी’वरून विरोधकांनी उपहास केला.

▪️ पोलिस खात्यात भरतीची गरज:
चोरीच्या वाढत्या घटना पाहता, आमदार युरी आलेमाव यांनी “रिक्त पोलिस पदे तात्काळ भरावीत” अशी ठाम मागणी केली.

▪️ पारंपरिक माटोळी विक्रेत्यांना दिलासा:
गोव्यात पारंपरिक माटोळी विकणाऱ्यांना ‘सोपो’ करातून सूट दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली.

▪️ शून्य प्रहरात आवाज उठवणारे सरदेसाई:
आमदार विजय सरदेसाई यांनी १७(२) अंतर्गत जमीन रूपांतराच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारले.

▪️ “सनबर्न नसेल तर दुसरं येईल”:
पर्यटन मंत्री रोहन खवंटे म्हणाले, “सनबर्न जर रद्द झाला, तरी इतर पर्याय आहेत. गोव्यात पर्यटनासाठी अनेक शक्यता आहेत.”

▪️ “मराठी हीच व्यवहाराची भाषा” – आमदार जीत:
आमदार जीत आवळे यांनी विधानसभेत ठामपणे सांगितलं – “धार्मिक आणि व्यवहारासाठी मराठीच योग्य भाषा आहे.”

Comments are closed.