पाहिलंत का, हल्ली १२ वी नंतर कोणता कोर्स करावा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आता जर तुम्हाला फक्त नोकरी नाही तर थेट परदेशात मोठ्या पगाराची नोकरी हवी असेल, तर बीबीए इन इंटरनॅशनल बिझनेस (BBA in International Business) हा कोर्स एकदम परफेक्ट आहे बरं का!
हा कोर्स ग्लोबल मार्केटच्या गरजेनुसार अगदी फाइन ट्यून करून बनवला आहे. म्हणजेच, तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सगळे बारकावे शिकवले जातात आणि त्यानंतर डायरेक्ट मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. बीबीए इन इंटरनॅशनल बिझनेस हा तीन वर्षांचा अंडरग्रॅज्युएट प्रोग्रॅम आहे.
इथे ग्लोबल मार्केट, ट्रेड पॉलिसी, इंटरनॅशनल फायनान्स, लॉजिस्टिक्स आणि क्रॉस-कल्चरल कम्युनिकेशन यांची सखोल माहिती दिली जाते. मुख्य म्हणजे, या कोर्सचा उद्देश विद्यार्थ्यांना जागतिक व्यापारी वातावरणात काम करण्यासाठी तयार करणे हा आहे. यात तुम्हाला इंटर्नशिप, एक्सचेंज प्रोग्रॅम आणि लाईव्ह प्रोजेक्ट्सचे अनुभव मिळतात. खास म्हणजे, ऍमेझॉन, डेलॉईट, केपीएमजी, ऍक्सेंचर आणि टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये या कोर्सला खूप मागणी आहे. शिवाय, इंटरपर्सनल स्किल्स, लीडरशिप आणि बिझनेस नेटवर्किंग याचंही ट्रेनिंग दिलं जातं. या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे. काही युनिव्हर्सिटीजमध्ये मेरिट बेसिसवर प्रवेश मिळतो, तर काही ठिकाणी CET, CUET, NPAT सारख्या परीक्षांच्या आधारावर ऍडमिशन मिळते.
भारतातील नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई), क्राइस्ट युनिव्हर्सिटी (बेंगळुरू), अमेठी युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमधील काही प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी हा कोर्स करता येतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजर, ग्लोबल सप्लाय चेन मॅनेजर, इंटरनॅशनल बिझनेस ऍनालिस्ट, फॉरेन ट्रेड कन्सल्टंट, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट मॅनेजर, फायनान्स आणि अकाउंटिंग रोल्स अशा विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी मिळतात. विशेष म्हणजे, या कोर्सच्या माध्यमातून परदेशात ८ ते २५ लाखांपर्यंत वार्षिक पगाराची नोकरी मिळू शकते. त्यामुळे, जर तुम्हाला १२ वी नंतर ग्लोबल करिअर घडवायचं असेल, तर बीबीए इन इंटरनॅशनल बिझनेस हा एक स्मार्ट आणि फ्यूचर प्रूफ निर्णय ठरू शकतो.