आदिवासींसाठी मोफत एमपीएससी प्रशिक्षण!-Free MPSC Coaching for Tribals!

Free MPSC Coaching for Tribals!

पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी जाहीर करण्यात आली आहे.

Free MPSC Coaching for Tribals!महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षांसाठी ४०० आदिवासी उमेदवारांना मोफत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात पीएसआय, एसटीआय, एएसओसारख्या पदांसाठी तयारी करता येईल.

हे प्रशिक्षण नामांकित खासगी व्यावसायिक संस्थेमार्फत अनिवासी पद्धतीने दिले जाणार असून, अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन राहील. इच्छुक उमेदवारांनी १४ ऑक्टोबरपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर (http://trti.maharashtra.gov.in) अर्ज करणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या गुणांकन पद्धतीवर आधारित असेल. शैक्षणिक अर्हता व सीईटी परीक्षेतील गुण लक्षात घेऊन उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेवरील अंतिम अधिकार आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याकडे असणार आहेत.

Comments are closed.