देशातल्या तरुण बांधवांसाठी एक भन्नाट बातमी हाय! पहिली नोकरी लागल्यावर सरकार थेट १५,००० रुपये तुमा खात्यात टाकणार हाय. “ईएलआय योजना” (ELI Scheme) नावानं ही स्कीम येणार हाय, जी १ ऑगस्ट २०२५ पासून सगळ्या भारतात लागू होणार आसा.
ही योजना केंद्र सरकारनं खास पहिल्यांदाच नोकरीवर लागणाऱ्या उमेदवारांसाठी आणली हाय. केंद्र सरकारनं या योजनेसाठी थेट ₹९९,४४६ कोटींचं बजेट मंजूर केलय, जे देशातल्या सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना खूप मोठं बळ देणारं हाय.
ELI योजना – कधी आणि कशासाठी?
१ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या काळात ज्या तरुणांनी पहिल्यांदा नोकरी स्वीकारली आणि PF (EPF) खातं सुरू केलं, त्यांना ह्याचा लाभ मिळणार.
१ लाखापर्यंत पगार असलेले उमेदवार पात्र राहतील.
१५,००० रुपये दोन हप्त्यांत:
पहिला हप्ता: सलग ६ महिने EPF मध्ये योगदान दिल्यावर
दुसरा हप्ता: १२ महिन्यांनंतर आर्थिक साक्षरतेचं ट्रेनिंग पूर्ण केल्यावर
कंपन्यांनाही होणार फायदा!
प्रत्येक नव्या कर्मचाऱ्यावर सरकार कंपन्यांना दरमहा ₹३,००० देणार:
कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत हवी
५० पेक्षा कमी कर्मचारी असतील, तर किमान २ नवीन भरती लागेल
५० पेक्षा अधिक असतील, तर ५ जणांची नवीन भरती
नवीन कर्मचारी ६ महिने सलग कामावर असले पाहिजेत
अर्ज नको! थेट लाभ:
योजनेसाठी कुठलाही वेगळा अर्ज करायची गरज नाही. नोकरी लागून EPF अकाऊंट सुरू झाल्यावर आणि तिथं नियमित पैसे भरले गेले की, थेट खात्यात रक्कम जमा होईल.

Comments are closed.