आता तरी भरतील का जागा?-Finally, Nagar Palika Hiring Begins!

Finally, Nagar Palika Hiring Begins!

अहिल्यानगर महापालिकेच्या रिक्त जागांचं घोंगडं आता थोडं हलाय लागलंय. कित्येक वर्षांपासून रिकामी असलेली तांत्रिक पदं भरायचं काम आता हातात घेतलं जातंय. अगदी ४५ महत्त्वाची पदं लवकरच भरली जाणार हे ठरलंय.

Finally, Nagar Palika Hiring Begins!महापालिकेनं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या सरकारी मान्यतेच्या संस्थेकडं भरतीसाठी प्रस्ताव पाठवला आणि करारही ठरून गेला. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, या भरतीमुळे कामातल्या तांत्रिक अडचणी सुटणार आणि गाडं सुरळीत चालणार.

भरतीत कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, संगणक प्रोग्रॅमर, लिपिक-टंकलेखक आणि पशुधन पर्यवेक्षक अशा पदांचा समावेश आहे.

महापालिकेची मंजूर कर्मचाऱ्यांची संख्या २७८० असली तरी निवृत्त झाल्यामुळे आणि सातव्या वेतन आयोगामुळे खर्च वाढल्यामुळे सगळ्याच जागा भरता आल्या नाहीत. म्हणून अत्यावश्यक ४५ पदांवरच भरती होणार. नगरविकास खात्यानं मंजुरी दिल्यावर महापालिकेनं प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून टीसीएसला काम सोपवलेलं.

भरली जाणारी मुख्य पदं:

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १५

  • इतर तांत्रिक व प्रशासनिक पदं – एकूण ४५

Comments are closed.