कोल्हापूर-पश्चिम महाराष्ट्रातल्या पालकांसाठी एक दिलासा देणारी बातमी हाती लागलीय! शाळांनी मनमानी पद्धतीनं वाढवलेल्या शिक्षण फीवर आता सरकारनं लक्ष घातलंय.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत जाहीर केलं की, शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियमावली तयार केली जात आहे आणि ती लवकरच लागू होणार आहे. काही खासगी शाळा विद्यार्थ्यांकडून मासिक ७०० रुपयांवरून थेट ७,००० रुपये फी आकारत आहेत, अशी तक्रार आमदार महेश चौघुले यांनी मांडली होती.
तसेच शालेय वस्तू विशिष्ट दुकानीच घ्या, अशा सक्त्या केल्या जात असल्याचंही भाजपचे अमोल जावळे यांनी सांगितलं. यावर मंत्री भुसे यांनी स्पष्ट केलं की, अशा कोणत्याही सक्तीवर कारवाई होईल आणि यासाठीही स्पष्ट नियमावली आखली जाईल. म्हणजे आता शाळा आणि दुकानांच्या संगनमताला ब्रेक लागणार आहे!